कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत “संपर्क से समर्थन” अभियान

मतदार संघातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी जात घेतल्या भेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात अभियान आघाडीवर
मोदी @ ९ या अभियानांतर्गत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत “संपर्क से समर्थन” या अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील श्री. सुधीर कुबल, चिंचवली गावातील शिरसेकर गुरुजी, शेर्पे गावातील एकनाथ शेलार, वांयगणी गावातील संभाजी बाणे, शिडवणे गावातील मनोहर कोकाटे या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरी जाऊन भेट घेतली.यावेळी भाजपा सरचिटणीस श्री.मनोज रावराणे,भाजपा तालुकाध्यक्ष श्री. संतोष कानडे,श्री प्रमोद रावराणे, अभियानाचे संयोजक श्री संदीप सावंत, श्री. दिलीप तळेकर, श्री भाऊ राणे, रफिक नाईक, श्री. सूर्यकांत भालेकर, श्री.रवींद्र उर्फ बाळा जठार, श्री.रमाकांत राऊत उपस्थित होते. त्याप्रसंगी आमदार या. श्री. नितेश राणे यांनी संवाद साधला.
दिगंबर वालावलकर/ कणकवली




