आचरा पारवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

आचरा परीसरात मंगळवार रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकरी राजा सुखावला आहे. बुधवार सकाळी पारवाडी येथील दिलीप मारुती पाडावे यांच्या घराच्या पडवीवर आंब्याचे झाड पडून सुमारे सात हजाराचे नुकसान झाले.
मृगनक्षत्र कोरडे गेल्याने आचरा परीसरात शेती कामे खोळंबली होती.काही शेतकऱ्यांनी पावसाची प्रतिक्षा करत न राहता भात पेरणी केली होती त्यांची शेती धोक्यात आली होती. मात्र पावसाने मंगळवार रात्री पासून जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.खोळंबलेल्या शेतीकामांना आता वेग येणार आहे. बुधवारी सकाळी आचरा पारवाडी येथील दिलीप मारुती पाडावे यांच्या घराच्या पडवीवर आंब्यांचे झाड पडून नुकसान झाले. याबाबत आचरा तलाठी संतोष जाधव कोतवाल गिरीश घाडी यांनी पंचनामा केला. यात पाडवे यांच्या घराच्या पडवीच्या छप्पराचे सुमारे सात हजाराचे नुकसान झाले.
आचरा / अर्जुन बापर्डेकर




