कणकवली नगरपंचायत च्या कचरा डेपोत कचरा टाकणाऱ्याला 5 हजारांचा दंड

कणकवली मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई

कलमठ मधील भंगार व्यावसायिकाला नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांचा दणका

कणकवली नगरपंचायत च्या कचरा डेपो मध्ये भंगारातील निरुपयोगी साहित्य आणून टाकल्या प्रकरणी कलमठ मधील भांगर व्यवसायीक विजय इंगळे यांना तब्बल 5 हजार रुपयांचा दंड कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केला. काही दिवसा पूर्वी एका वाहनातून कणकवली नगरपंचायत च्या कचरा डेपो मध्ये नगरपंचायत च्या व्यतिरिक्त अन्य एका वाहनामार्फत कचरा टाकल्याची बाब नगरपंचायत च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली होती. त्यावर मुख्याधिकारी श्री. तावडे यांनी सदर कचरा हा विजय इंगळे यांनी टाकायला सांगितल्याची बाब समोर आली. त्यानंतर श्री तावडे यांनी विजय इंगळे यांना याबाबत नोटीस बजावली व 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यानंतर पुन्हा अशा प्रकारे कचरा टाकणार नसल्याचे लेखी लिहून घेतल्याची माहिती त्यांनी दिली. नगरपंचायत च्या या कारवाईमुळे नगरपंचायत च्या कचरा डेपो मध्ये शहरा बाहेरून आणून कचरा टाकणाऱ्यांना मात्र आता या धडक कारवाईला सामोरे जावे लागनार आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!