आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनि.कॉलेज वरवडे मध्ये राजश्री छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी

कणकवली/मयुर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनि. कॉलेज वरवडे मध्ये राजश्री छत्रपती शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,त्यानंतर छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला,दिया प्रभुदेसाई या प्रशालेच्या विद्यार्थिनीने छत्रपती शाहू महाराजांविषयी आपल्या भाषणातून विचार मांडले.
या दिनाचे औचित्य साधून इंडियन टलेंट ऑलिम्पियाड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
१) निबंध
१) दिया प्रभुदेसाई ( १० वी)
राज्यात ४ चौथी
२) आर्यन ऋषिकेश यादव
राज्यात ७ वा
२) चित्रकला
१) लिशा रुपेश जाधव
राज्यात १५ वी
३) विज्ञान
१) शरण्या प्रवीण ओहोळ
राज्यात १९ वी.
४) गणित
१) सोनम संतोष अरखराव
राज्यात १८ वी
त्याचप्रमाणे वैष्णव पाटील,गौरेश तायशेट्ये,सई डामरी,युक्ता सावंत ,आरोही दळवी,शर्वरी सावंत ,यांना सुवर्ण आणि यश पवार ,आदित्य घुगे,यांना रोप्य,आणि कार्तिकी पावसकर, हिला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आले.यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंदपटेल,श्री.डी.पी.तानावडे,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.