कोनाळकट्टा येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

दोडामार्ग l प्रतिनिधी
कोनाळकट्टा येथील एम आर.नाईक विद्यालयातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात दिमाखात झाला . यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष तथा लोकनेते सुरेश दळवी, प्रमुख पाहुणे म्हणून संदीप गवस, संस्थेच्या सचिव स्वाती नाईक, संस्था संचालक श्री. बांदेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सुशांत मणेरीकर, कोनाळचे माजी उपसरपंच पांडुरंग लोंढे, शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते मधुकर लोंढे, सरपंच अस्मिता गवस आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व पालकांनी कसे वागावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. श्री. दळवी यांनी पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत के.एस.नाईक यांनी केले .प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी केले. प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व वह्या देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. श्री.दळवी यांनी विद्यार्थ्यांना मिठाई दिली.स्वाती नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती आडेलकर यांनी केले .श्री गवस यांनी आभार मानले. तसेच श्री. ओतारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.





