आयीतील मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मंत्री केसरकरांकडून आर्थिक मदत

दोडामार्ग l प्रतिनिधी
आयी येथील महादेव शेटकर यांच्या एक वर्षीय मुलाचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावयाचे असल्याने त्याला परेल मुंबई येथील वाडिया इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी 34 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. श्री. शेटकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यामार्फत तत्काळ २५ हजार रुपयांची मदत केली आणि मुख्यमंत्री सहायता निधीतूनही आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख (शिंदे गट) गणेशप्रसाद गवस, अशोक दळवी, नारायण राणे (इन्सुली), सज्जन धाऊसकर, लक्ष्मण गवस, संजय गवस, सुनील डुबळे, सुनील मोरजकर, योगेश तेली, राजा गावकर महेश शेटकर,ज्ञानदेव शेटकर आदींनी ती रक्कम महादेव शेटकर यांच्याकडे सुपूर्द केली.

error: Content is protected !!