कणकवली पोलिसांच्या वतीने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना बाबत जनजागृती

कणकवली पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम
जागतिक अमली पदार्थ विरोधी सप्ताह च्या अनुषंगाने कणकवली एस एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कणकवली येथे जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांनी अंमली पदार्थ त्याचे सेवन आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. नमूद कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली