शेती कर्ज नूतनीकरणास घातलेली बंदी उठवावी

दीपक केसरकर यांची सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी

दोडामार्ग l प्रतिनिधी
सहकारी सोसायटी शेती कर्ज नूतनीकरणास (पुनर्गठण) घातलेली बंदी उठवावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.
त्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा बँक कडून घेतलेल्या कर्जाचे दरवर्षी ३० जूनला नूतनीकरण करण्यात येते; परंतु यावर्षी सहकार आयुक्त. महाराष्ट्र राज्य यांनी कर्ज पूर्ण भरणा केल्यानंतरच कर्ज नूतनीकरण करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. शेतकऱ्यांना सद्यस्थितीत खरीप हंगामासाठी शेती, बागायती खते, बी-बियाणे, औजारे व इतर शेती साधने खरेदी करण्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे. यावर्षी मॉन्सून लांबल्यामुळे अनेक कामे खोळंबलेली आहेत. तरी शेतकऱ्यांना मदत होण्याच्या अनुषंगाने सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देवून विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश देण्याबाबत शेतकऱ्यांकडून निवेदन सादर करण्यात आलेले आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देवून विविध कार्यकारी सोसायटींचे कर्ज पुनर्गठन करण्याचे
आदेश देण्यात यावेत असे म्हंटले आहे.

error: Content is protected !!