आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त जि.प.प्राथमिक शाळा कुरंगवणे येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कुरंगवणे सरपंच संतोष (पप्पू) ब्रह्मदंडे यांच्या वतीने करण्यात आले वह्या वाटप
आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरंगवणे येथील जि. प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले आहे.कुरंगवणे सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांच्या वतीने हे वह्या वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तालुका कार्यकारिणी सदस्य रविंद्र लाड , बुथ अध्यक्ष संजय लाड, ग्रामपंचायत सदस्य विशाखा राऊत, रविंद्र पवार , अक्षदा सादिकले , सामाजिक कार्यकर्ते अंकुश सादिकले, राजेंद्र लाड , पांडुरंग पांचाळ, दिप्ती पाटील, यशवंत पवारआदी उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





