आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्याना गणवेश व खाऊ वाटप

संकेत शेट्ये मित्र मंडळ खारेपाटण यांचा शैक्षणिक उपक्रम
कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये मित्रमंडळ खारेपाटणच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथील विद्यार्थ्याना शालेय गणवेश तसेच खाऊ वाटपचा कार्यक्रम आज शाळेत संपन्न झाला.
या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,समिती सदस्या सौ समृध्दी लोकरे, शाळेचे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर तसेच श्री संकेत शेट्ये मित्र मंडळ खारेपाटण चे कार्यकर्ते श्री संकेत लोकरे, खारेपाटण. ग्रा.प.सदस्य किरण कर्ले, नडगिवे माजी सरपंच श्री अमित मांजरेकर,सुहास राऊत,प्रज्योत मोहिरे,आदिनाथ शेट्ये,सिंदूर लवेकर,राज गुरव,आदित्य पिसे,अमित कांबळी,सुमित साटवीलकर,विपुल गुरव,अनिकेत जामसंडेकर,नरेंद्र गुरव,रुपेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथील एकूण ३३ विद्यार्थ्याना सुमारे १०,००० रुपये किमतीचे शालेय गणवेश व शाळेतील सर्व विद्यार्थ्याना खाऊ वाटप श्री संकेत शेट्ये मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये यांनी खारेपाटण गावात सामाजिक दातृत्वतून विविध उपक्रम राबविले असून आज आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श घेत आज खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून सामाजिकतेचा वसा जपला आहे. असे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण