आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली मधलीवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत भाजपा खारेपाटण विभागाचे शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. नम्रता को, उपाध्यक्ष श्री. दिनेश पांचाळ, भाजपा कार्यढकर्ते श्री. योगेश गुरव, सौ.साक्षी भालेकर दर्शना गुरव सुरेखा भालेकर यांसह शाळेचे शिक्षक श्री. अमोल भंडारी, श्री. गोरक्षनाथ गायकवाड, श्री. अमोल तुपविहिरे आदी उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





