अखेर “नवीन कुर्ली” ग्रामपंचायत प्रस्ताव मंजुरीला अंतिम मंजुरी

गेल्या अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काम मार्गी
नवीन कुर्ली वसाहत वासीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मानले आभार
देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विस्थापित कुर्ली ता.वैभववाडी.या गावाचे पुनर्वसन सन १९९५ साली नवीन कुर्ली (फोंडा—लोरे)या ठीकाणी करण्यात आले.सदर पुनर्वसित गावठाणास सन २००२ साली महसुली गावठाणाचा दर्जा प्राप्त झाला.तत्कालीन पुनर्वसन अधिनियमानुसार आणी निकषानुसार मागील २१वर्ष या गावठाणाची स्वतंत्र ग्राम पंचायत झालीच पाहिजे असा रास्त आग्रह नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचा होता. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर “नवीन कुर्ली”या पुनर्वसित गावठाणाच्या स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्यक्ष भेटीअंती पुर्नत्वाची मोहोर उठविण्यात आली. आणी गेली २१ वर्षे अंधःकाराच्या खाईत लोटलेल्या नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्तांच्या चेहर्यावर हास्य उमटले.
सदरच्या नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्तावाच्या पुर्णत्वाच्या कार्यामध्ये आतापर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत,किरणजी(भैय्या) सामंत, आमदार रवींद्र फाटक,नितेश राणे साहेब,शीवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे,कणकवली विधान सभा अध्यक्ष संदेश पटेल.यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.त्यामुळे या सर्वांचे नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणी नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष श्री.रविंद्र नवाळे,कार्याध्यक्ष श्री.हरेश पाटील यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्यक्ष भेटीअंती सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी एकनाथ चव्हाण, भगवान तेली ,शिवा जी चव्हाण ,मारुती कदम ,मिलिंद पवार ,सुनील कदम ,आनंद सावंत ,प्रदीप कामतेकर,राजेद्र् तेली ,उत्तम तेली,पांडुरंग चव्हाण ,बाळा दळवी,चंद्रकांत तेली,चंद्रकांत चव्हाण, सुनील गोसावी, सखाराम हुंबे,संपत चव्हाण,शांताराम राणे,पांडुरंग पार्टे,गणेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कणकवली