कणकवली शहरातील बाजारपेठ, सर्व्हीस रस्त्यावरील अतिक्रमण हटवले

कणकवली मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत पथकाची कारवाई
कारवाईत सातत्य राहण्याची गरज
कणकवली शहरातील बाजारपेठ रस्त्यावर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत आज कणकवली नगरपंचायत च्या पथकाने अचानक हटवत कारवाई केली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत कणकवली पटवर्धन चौक ते झेंडा चौकापर्यंत रस्त्यावर लावलेल्या दुकानांना हटवण्यात आले. तर सर्विस रस्त्यावरीलही काही दुकानांना हटवत कारवाई करण्यात आली. यावेळी काहींचा माल जप्त करण्यात आला. रस्त्यावर दुकाने मांडत असल्याने कणकवली बाजारपेठेत नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. वाहतूक कोंडी मुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. मात्र याबाबत विक्रेत्यांकडून सूचना देऊन देखील कोणतीही नियमाचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या सुचने नुसार पथका कडून ही आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, कर्मचारी रवी म्हाडेश्वर यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. काही विक्रेत्यांनी व व्यापाऱ्यांनी नगरपंचायत च्या पथकाशी हुज्जत देखील घातली. तर नगरपंचायत करून किरकोळ विक्रेत्यांसाठी एक मोठ्या विक्रेत्यांना एक नियम लावला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. त्यामुळे यापुढे कणकवली नगरपंचायत कडून या प्रश्नी सातत्याने सर्व समावेशक कारवाई होणार काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली