मातृत्व स्त्रिच्या आयुष्यातील परमोच्च क्षण : डॉ. वर्षा पाटील

सिद्धगिरी जननी शिबिराला दोडामार्गात लक्षणीय प्रतिसाद
दोडामार्ग l प्रतिनिधी
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील परमोच्च क्षण आहे त्यासाठी प. पू. काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रेरणेतून सिद्धगिरी हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे.ज्यावेळी मातेच्या हाती सुदृढ बाळ येईल तेव्हा आम्हाला आनंद वाटेल. मातृत्व सुखासाठी मातांना जे सहकार्य हवे ते आपण देऊ, अशी ग्वाही सिद्धगिरी जननी आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका आणि विभागप्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी रविवारी येथे केले.
तालुक्यातील काडसिद्धेश्वर सांप्रदायाच्या वतीने आणि लोकनेते सुरेश दळवी यांच्या सहयोगातून विलास हॉल येथे मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी डॉ. पाटील यांच्यासमवेत गुरुबंधू एकनाथ गवस, लक्ष्मण कानडे, नारायण गवस, प्रदीप गवस, राकेश धर्णे, पत्रकार तुळशीदास नाईक, तेजस देसाई, शंकर जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाल्या ,विदेशात शिक्षण घेऊन या भागातील महिलांना सेवा देण्यासाठी प. पू.काडसिद्धेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने आले . शिवाय केवळ तपासणी व उपचारापुरती तुमच्याशी बांधील न राहता तुमच्या प्रत्येक अडचणीत आपण सोबत असेन असा शब्दही त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
सूत्रसंचालन संजय गवस यांनी तर प्रास्ताविक एकनाथ गवस यांनी केले. श्री देसाई यांनी आभार मानले. शिबिराचा लाभ ९५ हून अधिक जोडप्यांनी घेतला. शिबिर यशस्वी होण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कर्मचारी वृंदाने सहकार्य केले.