खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना

माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिर व मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याची पहाणी केली. हा रस्ता पूरपरिस्थिती पाण्याखालील जात असून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधीत सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना सूचना दिल्या.यावेळी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यासह खारेपाटण येथील स्थानिक कार्यकर्ते भाऊ राणे, राजेंद्र वरूनकर, प्रशांत गाठे, शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!