विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवा–निलिमा सावंत

आचरा–अर्जुन बापर्डेकर
नव्या वातावरणात नव्या जोमाने शिक्षण हेच आपले ध्येय घेऊन उज्वल यशातून शाळेचे आणि आपल्या गावाचे नावलौकिक वाढवा असे आवाहन माजी सभापती आणि आचरा हायस्कूल स्कूल कमेटी अध्यक्षा निलीमा सावंत यांनी आचरा हायस्कूल येथे काढले.
न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे स्वागत आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक स्कूल कमेटी सदस्य राजन पांगे,अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडे यांसह इतर शिक्षक आदी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले .यानंतर आयोजित स्वागत सोहळ्यात मुलांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजमसर यांनी केले. तर आभार घुटूकडे यांनी मानले..