जानवली नदी लगतच्या एका बिल्डिंग खाली जोरदार “फ्री स्टाईल”

रात्रीच्या वेळीच्या फ्री स्टाईल चे कारण मात्र गुलदस्त्यात

कणकवली शहरालगत जानवली नदीकडे असलेल्या एका बिल्डिंग जवळ यापूर्वी एका देश पातळीवरील राजकीय पक्षाचा पदाधिकारी राहिलेल्या एका माजी पदाधिकाऱ्यासोबत काहींची जोरदार फ्री स्टाइल हाणामारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास झाली. हाणामारीचे कारण जरी समजले नसले तरी ही फ्रीस्टाइल पाहण्यासाठी मात्र आसपासच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. तर या फ्री स्टाईल वेळी एकमेकांना शिव्या देखील घातल्या गेल्याचे समजते. पाटील की साठी फेमस असलेल्या त्या माजी पदाधिकाऱ्यासोबत नेमका कशावरून वाद झाला व फ्री स्टाइल चे नेमके कारण काय हे समजु शकले नाही. तरी या जानवली नदी लगत झालेल्या या फ्री स्टाइल ची चर्चा मात्र कणकवली शहरात जोरदार सुरू आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!