आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या कु.सुश्रुत नानलची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे चा विद्यार्थी सुश्रुत मंदार मानल याने विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मजल मारली आहे आपल्या उत्तम आणि चमकदार खेळामुळे सुश्रुत ने हे यश खेचून आणले आहे.
या त्याच्या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी. पी. तानावडे, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.






