दहावी उत्तीर्ण झाल्यावर आता पुढे काय? 17 जून रोजी कसाल येथे मोफत कार्यशाळा

कसाल – दहावीनंतर नेमकं काय करायचं हा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडलेला असतो. इयत्ता दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. इथूनच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे हे ठरते हायस्कूल नंतर आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स यापैकी कोणता विषय निवडायचा? कोणते क्षेत्र निवडल्यावर करिअरमध्ये चांगले पर्याय मिळू शकतील? याविषयी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही अधिक चिंतेत असतात.
आज विज्ञान वाणिज्य किंवा आर्ट्स या तीनही क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. बदलत्या काळानुसार पारंपारिक कोर्सेस मध्ये नवीन अभ्यासक्रम वाढले असून त्यासोबत करिअरचे पर्याय वाढले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना कोणता विषय आवडतो हे त्यांनी स्वतः ओळखले पाहिजे .नेमका कला, विज्ञान किंवा वाणिज्य यापैकी कोणते क्षेत्र सर्वाधिक आवडते यासाठी स्वतःचा शोध घेणे आवश्यक आहे. अकरावीला प्रवेश घेताना कोणते क्षेत्र निवडावे? कॉलेज निवडताना कोणती काळजी घ्यावी? आपण जे क्षेत्र निवडणार आहोत त्या क्षेत्रामध्ये अत्युच्च शिखर कसे गाठावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल एसटी स्टँड मागे या ठिकाणी शनिवार दिनांक 17 जून रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थी पालक यांना मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कसाल ,कणकवली, मालवण ,कुडाळ परिसरातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन युरेका सायन्स क्लब मार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी सुषमा केणी 9284035326 या क्रमांकावर संपर्क साधावा.