खारेपाटण बाजरपेठेत चिखलाचे साम्राज्य

नागरिकांना बाजारपेठेतुन प्रवास करणे होतेय मुश्किल
नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी करण्यात येत आहेत उपाययोजना- इसवलकर,सरपंच
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या खारेपाटण बाजरपेठेत सध्या चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मान्सून तोंडावर असताना खारेपाटण बाजरपेठेत नूतन पाणी पुरवठा पाईपलाईन चे काम सुरू करण्यात आले असून यासाठी जेसीबी च्या साहाय्याने रस्त्याची साईडपट्टी खोदण्यात आली आहे.यामुळे बाजरपेठेत मातीचा थर जमा होऊन त्यावर पाऊस पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, एकीकडे बाजारपेठेत असणारा अरुंद रस्ता आणि त्यात हे खोदलेल्या खड्याच्या मातीमुळे निर्माण झालेला चिखल यातून वाट काढून प्रवास करणे नागरिकांना अत्यंत त्रासदायक होत आहे , या चिखलातून चालताना पाय घसरून पडणे ,वाहनांची चाके चिखलात अडकणे हे प्रकार घडले होते आणि घडत आहेत. खारेपाटण बाजरपेठेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकं बँका ,हॉस्पिटल, बाजार ,किराणा दुकाने यासाठी अवलंबून आहेत.ही सर्व ठिकाणे खारेपाटण बाजरपेठेत च असल्याने लोकांना मोठी कसरत करून चिखलातून प्रवास करावा लागत आहे.ऐन मान्सून च्या काळात हे काम सुरू असल्याने बाजारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्याशी संपर्क केला असता त्यानी असे म्हंटले आहे की , जलजीवन मिशन अंतर्गत खारेपाटण गावच्या पाणीपुरवठा नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले होते.कामासाठी लागणारे अत्यावश्यक पाईप हे उपलब्ध नसल्याने ठेकेदाराने ही हे काम लांबणीवर टाकले होते, पुन्हा हे काम लांबणीवर जाऊ नये यासाठी हे काम करण्यात येत आहे आणि खारेपाटण मधील काही पुढाऱ्यांनी च बाजारपेठे तले हे पाण्याच्या पाईपलाईन चे काम आधी करा अशी मागणी केली होती.पाईपलाईन चे हे काम लोकांच्या हिताचे आहे. परंतु सध्या बाजारात झालेल्या चिखलामुळे लोकांना जो त्रास होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असून लोकांचा हा त्रास कमी करण्यासाठी ग्रामपंचायत कडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत,लोकांनी खबरदारी /काळजी घेऊन बाजरातून प्रवास करावा ही विनंती, लोकांनी ग्रामपंचायत ला सहकार्य करावे.असे मत सरपंच इसवलकर यांनी व्यक्त केले आहे.
बाजरपेठेत झालेल्या चिखलामुळे लोकांना सहन करावा लागणार हा त्रास लवकर दूर करावा अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण