राज ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने फळे वाटप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश जगन्नाथ कदम महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयात कणकवली येथे फळे व बिस्किटे वाटप व कासार्डे जांबूळवाडी येते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ एन . एस .धर्माअधिकारीर यांचा सन्मान सुनिल प्रभाकर सोनार यांच्या हस्ते केला गेला. यावेळी महाराष्ट्र सैनिक मधु कावले , रणजित सावंत, शांताराम सादये,समीर तेली, जयदेव शिर्सेकर,रोहन लाड,मनोज लाड, दत्ताराम बिरवाडकर, अमृते आदी उपस्थित होते.
आचरा / अर्जुन बापर्डेकर