कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर कलमठ ग्रामस्थांची कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक

ग्रामीणच्या अभियंत्यांवर प्रश्नांचा भडीमार
कार्यकारी अभियंत्यांची सकारात्मक भूमिका
आजपासून सिद्धेश धुत्रे नवीन वायरमन नियुक्त
कलमठ गावातील वीज प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक.
कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे ,कमी दाबाचा पुरवठा ,नादुरुस्त वीज खांब , अपुरे कर्मचारी , अधिकरी नॉट रिचेबल , बाजारपेठ मध्ये 4 दिवस होणार लपंडाव अश्या अनेक तक्रारी देऊन देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने किंवा विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने आता ग्रामस्थांनी थेट विज कार्यालयाला टाळे ठोकले, त्यांनंतर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेत समस्येचा पाढा वाचला.
कुंभारवाडी , सुतारवाडी ,लांजेवाडी ,बीडीएवडी , दत्त नगर ,सिद्धार्थ कॉलनी येथे नवीन वीज खांब बदलणे , जखमी वॉटरमबी रामू सांगवेकर याना मदत करावी व कलमथ गावात नवीन वायरमन नियुक्त करावा अशी मागणी केली असता तात्काळ कलमठ साठी. नवीन वायरमन देण्याचे मान्य करून सिद्धेश धुत्रे यांना वायरमन म्हणून नियुक्त केले . कलमठ गावातील नादुरुस्त वीज खांब , ट्रान्स्फार्मर अभावी कमी दाबाचा वीज पुरवठा यावर चर्चा केली असता 4 दिवसात नवीन पोळ देण्याचे आश्वासन बाळासाहेब मोहिते यांनी दिले. कलमठ बाजारपेठ मधील सदोष असलेली वीज वाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश यावेळी मोहिते यांनी दिले .यावेळी सरपंच
संदीप मेस्त्री ,महेश लाड ,कनिष्ठ अभियंता श्रीराम राणे , वायरमन मोहिते ,पपू यादव ,नितीन पवार ,दिनेश गोठणकर ,श्रेयस चिंदरकर ,आबा कोरगावकर ,बाबू नारकर ,मिलिंद चिंदरकर ,तेजस लोकरे ,वैभव चिंदरकर , निखिल कुडाळकर ,सत्येंद्र जाधव ,सचिन वाघेश्री ,प्रसाद काकडे , आबा कोरगावकर , चिंदरकर ,प्रथमेश धुमाळे ,नाना गोठणकर ,विजू धुत्रे ,बंडू दंताळ , उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी