सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात आढळली 6 फूट भली मोठी मगर

त्या मगरीची वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता

सावंतवाडी प्रतिनिधि

मगरी आता वस्तीत फिरू लागले आहेत. त्यामुळें लोक चीताग्रस्थ बनले आहेत, मगरीचे प्रमाण जील्यात वाढत आहे. काल रात्री
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील मिरेस्तीवाडी येथे रमाकांत कुलकर्णी यांच्या घरच्या परिसरात एक मगर आढळली .

त्या मगरीची सावंतवाडी वन विभागाच्या कर्मचारी यांनी यशस्वी सुटका करत तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की असा की, तळवडे येथे मानवी वस्तीजवळ मगर आढळून येत असल्याबाबत वन विभागाला कळाले नुसार सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली वन विभागाचे जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे 6 फूट लांबीची मगर श्री. कुलकर्णी यांचे घराच्या परिसरात असल्याचे दिसून आले. सदरची मगर ही श्री. कुलकर्णी यांचे घरच्या जवळ असलेल्या होडावडा नदीतून अली असण्याची शक्यता दिसून आली. वन विभागाचे कर्मचारी श्री.रामचंद्र रेडकर यांनी तळवडे ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने सदर मगरीला यशस्वीरित्या पकडले.

त्यानंतर ती मगर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुदृढ असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदरची मोहीम ही उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक रमेश पाटील, प्रकाश रानगिरे, वनमजुर रामचंद्र रेडकर तळवडे येथील रहिवासी श्री.बाळा जाधव, रत्नाकर कोंडये आणि इतर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. हि मगर बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी
रत्नाकर कोंड्ये यांना प्रथम दिसली त्यांनी यांची कल्पना इतर ग्रामस्थ यांना दीली व वनविभाग यांना माहिती देण्यात आली.त्यांनतर उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक रमेश पाटील, प्रकाश रानगिरे, वनमजुर रामचंद्र रेडकर याच्या यांनी त्या मग रीस पकडून नेसर्गीक अधिवासात सुखरूप सोडले.

error: Content is protected !!