संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू

सासोली वेंगुर्ले जलवाहिनी : डेगवेत होती डोंगर खचण्याची भीती
दोडामार्ग प्रतिनिधी
डेगवे येथील डोंगर खचण्याची भीती लक्षात घेऊन बांदा दोडामार्ग मार्गावर जीवन प्राधिकरणच्या जलसंचय टाक्यांच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
सासोलीतून वेंगुर्ले, मालवणकडे नेल्या जाणाऱ्या पाण्यासाठी डेगवे येथे बांधण्यात आलेल्या टाक्या आणि पंप हाऊससाठी डोंगराची खोदाई केली आहे. पावसाळयात तो डोंगर खचून बांदा दोडामार्ग रस्ता बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी तेथे मजबूत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी केली होती.त्यांनतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामात सुरवात करण्यात आली. त्याबद्दल श्री. देसाई यांनी समाधान व्यक्त केले.





