कणकवली शहरातील दिव्यागांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते मोफत ई बाईकचे वाटप

शासन आपल्या दारी अंतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत उपक्रम
शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायत मध्ये आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली शहरातील दिव्यांगाना ई बाईक चे वितरण करण्यात आले. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत या ई बाईक चे वितरण करण्यात आले. यावेळी कणकवलीचे प्रांताधिकारी तथा नगरपंचायतचे प्रशासक जगदीश कातकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, महेश सावंत, आण्णा कोदे, रवींद्र गायकवाड, अभिजित मुसळे, प्रवीण गायकवाड, किशोर धुमाळे, ध्वजा उचले, रुजुता ताम्हाणेकर, राजा पाटकर, सुमित कुबल आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली