मळगाव प्रशालेच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी प्रतिनिधि
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव च्या नुकत्याच उत्तीर्ण दहावीच्या विद्यार्थ्याचां कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चनाताई घारे परब व सिद्धेश तेंडोलकर मित्रमंडळातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्रथम क्रमांक सुचित्रा धुरी 97.60, द्वितीय क्रमांक शिवम जोशी, रिया नाईक, वृषाली कुंभार 93.40, तृतीय क्रमांक सिद्धी गावडे 90.20 या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अर्चना ताई घारे परब, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पर्यावरण विभाग पांडुरंग नाटेकर, सिद्धेश तेंडोलकर, दर्शना बाबर देसाई, तुषार वालावलकर, सिद्धी तेंडोलकर, टिळक सावळ, पत्रकार सुखदेव रावूळ, गुरुनाथ गावकर, दीपक जोशी निलेश मांजरेकर, सुदेश रावुळ, महेश गवंडे, हरी आसयेकर, शशिकांत राऊल, दीपक जोशी, तसेच मळगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 10 वी , 12 वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतच पुढील करिअर निवडताना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी मानचिन्ह, कॉलेज बॅग, छत्री,शाल व श्रीफळ देवून विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.





