दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर यांचे निधन

प्रतिनिधी l दोडामार्ग
दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष व शिवसेनेचे दोडामार्ग शहरप्रमुख लवू मिरकर (वय ५५) यांचे रविवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
गोवा बांबोळी येथील गोमॅको रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
ते कला, क्रीडा,राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचे जवळचे संबंध होते.पिंपळेश्वर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळाचे सक्रिय पदाधिकारी होते.सदा हसतमुख, मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.कसई दोडामार्गच्या माजी नगरसेविका सुषमा मिरकर यांचे ते पती होत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, पुतणे, पुतणी, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.





