कणकवलीतील तो मृतदेह भिरवंडे येथील महेश सावंत यांचा

कणकवली साईनगर येथे आढळला अज्ञात मृतदेह हा भिरवंडे खलांतरवाडी येथील महेश दत्ताराम सावंत (वय 40) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. महेश यांना दारूचे व्यसन असून तो अविवाहित होता अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली. त्यांच्या पश्चात वडील आई व दोन भाऊ आहेत. ते मुंबई भांडुप येथे राहतात. भिरवंडे येथील त्यांचे काका अशोक विश्राम सावंत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी येत ओळख पटवली.
कणकवली प्रतिनिधी