खोटले हायस्कूल माध्यमिक शालांत परीक्षेत १०० % यश

संतोष हिवाळेकर पोईप
कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल संचलित सौ.सुहासिनी श्रीधर परब हायस्कूल खोटले या प्रशालेचा मार्च 2023 10 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे
या प्रशालेतून 31 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण होत निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पियुष प्रमोद पुजारे यांला 86 25%, गुण व्दितीय क्रमांक वैशाली विनेश परब हिला 85.20% गुण तृतीय क्रमांक सिद्धी विजय परब हिला 83.40% गुण प्राप्त केले आहेत
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री आनंद (भाई )सावंत ,सचिव यशवंत परब व विश्वस्त तसेच शाळा समिती अध्यक्ष नंददीपक गावडे ,मुख्याध्यापक ,शिक्षक ,कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे