जोडे मारून सावंतवाडीत खासदार संजय राऊतांचा निषेध

मंत्री दीपक केसरकरांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

सावंतवाडी प्रतिनिधि

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सावंतवाडी शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालय समोर राऊत यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!