स्व. प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे . सेवाभावी संस्थां आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय वस्तुंचे करण्यात आले वाटप

सावंतवाडी प्रतिनिधि

स्वर्गीय प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे ता. सावंतवाडी, तसेच गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रकाश परब संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते तळवडे गावातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय वस्तुंचेही वाटप करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, त्यामध्ये नियमित रक्तदात्यांसोबतच विशेष करुन युवराज ठाकूर, काशीराम कुंभार, अभिषेक नाईक, प्रकाश गावडे, मनोज मुळीक, जालिंदर परब, ओमकार दि. नाईक, शुभम मालवणकर, ओमकार वि. नाईक, साहिल परब, अनिकेत काजरेकर, गौरव मेस्त्री, मधुकर सावंत या युवकांनी रक्तदान केले.
यावेळी प्रकाश परब मित्रमंडळाचे अध्यक्ष रविंद्र सावंत, प्रा नारायण उर्फ राजू परब, तळवडे सरपंच सौ. वनिता मेस्त्री, उपसरपंच गौरव मेस्त्री, आपा परब, विलास परब, बाळू मालवणकर, विलास नाईक, अनिल जाधव, महेश परब, बाळू कांडरकर, सौ. निशा शिरोडकर, कु. नमिता सावंत, श्री घाडी सर, रवींद्र परब, सूरज डिचोलकर, दिनेश परब, संतोष राऊळ, तात्या परब, विजय मेस्त्री, सौ. प्राजक्ता गावडे, पंढरीनाथ मांजरेकर, उदय गावडे, बबन जाधव, उमेश आचरेकर, अभिषेक मेस्त्री, रघुनाथ काजरेकर, गोपाळ गावडे, भीमसेन नाईक, आबा रेडकर, सुनील परब, राजन कोरगावकर, संतोष गावडे ई. कार्यकर्ते व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष दीपक तारी, तालुका सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सहखजिनदार मधुकर उर्फ योगेश सावंत उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते स्वर्गीय प्रकाशजी परब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन प्रा.नारायण उर्फ राजू परब यांनी केले, तर आभार कु. नमिता सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!