आर ए यादव हायस्कूल आडवलीचा एस एस सी निकाल शंभर टक्के

आचरा –अर्जुन बापर्डेकर
आर ए यादव हायस्कूल आडवलीचा एस एस सी परीक्षेत सर्व च्या सर्व २३मुले पास होत प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला .यात वेदिका हेमंत घाडीगांवकर हिने ९२टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली.साक्षी विद्याधर तुळपुळे हिने ९१.८०टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर अनुष्का अनिल तांडेल हिने ९१.६०टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला . यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई चे अध्यक्ष सर्व समिती सदस्य,मूख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक स्कूल यांनी अभिनंदन केले आहे