हरिश्चंद्र घाडीगांवकर यांचे निधन

वरवडे , तालुका कणकवली येथील हरिश्चंद्र गोपाळ घाडीगांवकर ( ८२ ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले . वरवडे गावचे माजी सरपंच असलेले हरिश्चंद्र घाडीगांवकर हे क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाचे माजी कार्यकारणी सदस्य होते . घाडीगांवकर समाजासहित इतर सर्व समाजाच्या कार्यांमध्ये ते नेहमी अग्रेसर असत . कट्टर राणे समर्थक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती . कणकवली बाजारपेठेमध्ये त्यांचा अगरबत्तीचा व्यवसाय होता . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे , दोन मुली , दोन सुना , नातवंडे असा परिवार आहे . वरवडे येथील प्रशांत घाडीगांवकर आणि राकेश घाडीगांवकर यांचे ते वडील होत .

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!