अखिल भारतीय हवामान सारांश आणि हवामान अंदाज पत्रक (All India Weather Summary and Forecast Bulletin)

अंदाज जारी केलेला दिनांक: २३ मे, २०२३
अंदाज जारी केलेला वेळ: ८.०० AM

नैऋत्य मान्सूनची प्रगती:
♦️नैऋत्य मान्सूनने निकोबार द्वीप समूहातील ग्रेट निकोबार व लिटिल निकोबार या बेटांना व्यापले असून नैऋत्य मान्सूनची उत्तरेकडील सीमा ५°उत्तर अक्षांश/८५° पूर्व रेखांश, ६.५ ° उत्तर अक्षांश/९०° पूर्व रेखांश व्यापून नॅनकोरी (Nancowry) या बेटामधून म्हणजेच १०° उत्तर अक्षांश /९८° पूर्व रेखांशा मधून जाते. (उपरोक्त नकाशात निळ्या रंगाच्या रेषेद्वारे नैऋत्य मान्सूनची सीमा दाखवण्यात आलेली आहे)
♦️बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडीलआणखी काही भागात तसेच अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील २ दिवसांत नैऋत्य मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

प्रमुख
ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे

error: Content is protected !!