शिवसेना शिंदे गटाचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले स्वागत
शिवसेना शिंदे गटाचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली यांची पक्षात घुसमट झाल्यामुळे पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. व त्यांच्या येण्यामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे.काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचा वातावरण झाले आहे. अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिली.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद भाई शेख यांच्या उपस्थितीत महेश तेली यांचा प्रवेश करण्यात आला
यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना तालुका सरचिटणीस व मीडिया ची जबाबदारी दिलेली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरये , युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबावकर निलेश मालडंकर ,प्रदीप कुमार जाधव ,कमलाकर तांबे, राजू वर्णॆ , अनिल डेगवेकर,प्रवीण वरुणकर जिल्हा सरचिटणीस , अमित मांडवकर ,संतोष तेली,अक्षय घाडीगावकर पंढरीनाथ पांगम व अनेक पदाधिकारी व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कणकवली