कुडाळ एम्.आय्.डी.सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशनचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर : आज वितरण

प्रतिनिधी । कुडाळ : महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन कुडाळ एम्. आय्. डी. सी. इंन्डस्ट्रीज असोसिएशने या वर्षापासून गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केले आहेत. असोसिएशनने डॉ. नितीन पावसकर, राजन नाईक, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर या त्रीसदस्यीय निवड समीती मार्फत कुडाळ औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडुन प्राप्त झालेल्या नामांकनातून यावर्षीच्या सन २०२३ सालच्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी या कामगारांची निवड केली आहे.
यामध्ये संतोष विठ्ठल गावडे, सुमो कंटेनर्स, १८ वर्षे सेवा, अनिल परिधान मिश्रा, विराज प्लास्टिक, २५ वर्षे सेवा, महेश राणे, चीवर सेवा, १८ वर्षे सेवा, सुनील धुरी, सुमो कंटेनर्स, सेवा १८ वषे, सतीश सुभाष हळदणकर, कॉनबॅक, सेवा १७ वर्षे, आना नाईक, लक्ष्मी इंडस्ट्रीज, सेवा १६ वर्षे, महेश गावडे, सुप्रीम फीड्स, सेवा १५ वषे, एकनाथ गवंडी, जान्स बांबू प्रोडक्टस, सेवा १५ वषे आणि सौ. स्मिता नाईक परब, नेटिव्ह कॉनबॅक बांबू प्रॉडक्टस सेवा १४ वर्षे या कामगारांना या पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
१ मे २०२३ महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या दिवशी सव असोसिएशन संकूल, फ्लॉट नं. पी / ४१, एम. आय. डी. सी. कुडाळ येथे प्रशांत सावळ, मरीन इंजिनिअर, मर्चंट नेव्ही, नामदेव सावंत, माजी सैनिक तथा वरीष्ठ अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पूरसाकार वितरण सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी दिली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!