कुडाळ एमआयडीसीत आग

कुडाळ ; कुडाळ एमआयडीसी येथील बलून कंपनीच्या बाजूला असलेल्या प्लॉट नंबर डी -४ मध्ये आज दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. या आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यावेळी तेथील ग्रामस्थ अजित मार्गी यांनी ही आग विझवण्यास मदत केली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या नेरूर तसेच नेरूर एमआयडीसी या ठिकाणी आगी लागण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. या आगीत कुठल्याही प्रकारे नुकसान झाले नाही. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
रोहन नाईक, कुडाळ


