तर राणेंची लफडी बाहेर काढू!

ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणेंचा इशारा

आमदार नितेश राणेंवर सडकून टीका

आमच्या नेत्यांवर यापुढे राणेंनी आरोप केले तर सगळी लफडी बाहेर काढू. तसेच कोकणात यापुढे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. आ. नितेश राणे यांनी कोकणातील विकासाचे मुद्दे सोडून रोज सकाळी टिवटिव करायला सुरुवात केली आहे.
स्वार्थी राणे कुटुंबियानी कोकणातील जनतेचा आपल्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी केला. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर उपस्थित होते.
ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना कोकणात येवून दाखवा, असे राणे बोलले. आम्ही आहोत, कोण अडवणार? आज पर्यंत कोकणी माणसाचा राणेंनी वापर केला. नेहमी कोकणी जनतेच्या विरोधात काम केलं आहे. रिफायनरी विरोधात विजयदुर्गच्या मंदिरात जाऊन नितेश राणेंनी आरती केली. त्यानंतर रिफायनरी गाडण्याची भाषा नारायण राणेंनी सभेत भाषण केलं होते. आता हेच राणे लोकांसमोर जावून रिफायनरी समर्थन करीत आहेत, असा टोला अतुल रावराणे यांनी केला. आतापर्यंत स्वतः ची भूमिकेवर राणे ठाम राहिले नाही. कायम स्वतः च्या फायद्यासाठी भूमिका घेतली. केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर केवळ भाटगिरी राणे करत आहेत. राज्यात आलेले मोठे प्रकल्प उद्योग गेलं तेव्हा नारायण राणे काय करत होते? राणेंनी गुजरात मध्ये रिफायनरी प्रकल्प घेऊन जावा. सिंधुदुर्गात राणे स्वतः पराभूत झाले आहेत. आ. नितेश राणे हे घोषणाबाज आमदार आहेत. नितेश राणे हे पुन्हा आमच्या विरोधात बोलले, तर त्यांनी याद राखवी. तुमची सगळी अंडीपिल्ली माझ्याकडे आहेत. वेळ लागणार नाही तुमचे कपडे फडायला? आमचा संयम तोडायला लावू नका. मुळात हिंमत असेल तर मंत्री नारायण राणे यांनी एकदा चांगला उद्योग आणावा. तुमचे अस्तित्व दाखवा. लोकसभा निवणुकीसंदर्भात ना. नारायण राणेंनी उभे राहून दाखवावे. खा. विनायक राऊत यांच्या समोर लढून दाखवावे, असे खुले आव्हान अतुल रावराणे यांनी दिला आहे. रिफायनरी प्रकल्प बाबत बोलताना नारायण राणे यांनी धमकी दिली आहे. त्यामुळे यापुढे चुकीचं प्रकार झाल्यास राणे कुटुंबियांची जबाबदारी राहील. भाजपात ही संस्कृती चालत नाही. सिंधुदुर्गात जुनी भाजप शांत आहे… आपले अस्तित्व आणि व्यवसाय सभाळण्यासाठी काम केलं जातं आहे, असा आरोप रावराणे यांनी केला. नितेश राणे हा संधीसाधू आमदार आहे. स्वतःच्या स्वार्था साठी नितेश राणे काम करतात. रिफायनरी बाबत स्किल वर्क कामगार आहेत का? जुने जमिनीचे व्यवहार पहिल्यांदा रद्द करा.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!