कणकवली नगराध्यक्षांचे काम राज्यात आदर्शवत!

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत ची लोकाभिमुख वाटचाल

माजी खासदार निलेश राणे यांचे गौरवउद्गार

कणकवलीतील बॉक्स क्रिकेट, फुटबॉल स्टेडियमचे व एलईडी स्वागत बोर्डाचे लोकार्पण

कणकवली नगरपंचायतने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कुठे राबवले गेले नाहीत असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे हे नेहमीच विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली ही नगरपंचायत यशस्वी वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार निलेश राणे यांनी काढले. कणकवलीतील गडनदी पुलावरील एलईडी स्वागत बोर्ड व आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली साकारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट व फुटबॉल स्टेडियम ते लोकार्पण आज करण्यात आले. याप्रसंगी निलेश राणे बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, रवींद्र गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे, संजीवनी पवार , भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, समीर प्रभुगावकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद पारकर, सुशील पारकर, राजन परब यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे यांनी या बॉक्स क्रिकेट स्टेडियम मध्ये काही वेळ खेळण्याचा आनंद घेतला. कणकवली नगराध्यक्ष यांना देखील आमदार नितेश राणे व निलेश राणे यांनी बॉलिंग टाकली. तर नगराध्यक्षांमधील काही वर्षांपूर्वीचा खेळाडू या निमित्ताने पाहायला मिळाला.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!