सामाजिक कार्यात उद्योजक बंडया परब याचे कार्य मोलाचे !अभिनेते संजय खापरे

तळवडे येते बंड्या परब मित्रमंडळ आयोजित कार्यक्रम वेळी व्यक्त केलं मत
सावंतवाडी प्रतिनिधि
आज कलावंताच्या गुणांचा विकास होण्यासाठी रसिकवर्ग याच सहकार्य महत्वाचे असते .तळवडे गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते बंड्या परब याचे सामाजिक, सांस्कतिक क्षेत्रात मोलाच सहकार्य असते असे मत नाट्य कलाकार तथा अभिनेते संजय खापरे यांनी तळवडे येते मत व्यक्त केले. डोन्ट वरी हो जायेगा! हे नाटक आयोजित करण्यात आले होते. यावेळी खापरे बोलत होते.यावेळी नाटकातील नाट्यकलाकर यांचा सत्कार परब कुटूबिय मार्फत आयोजीत करण्यात आला होता.
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे या ठिकाणी श्री देव दाळकर देवाच्या वार्षिक जत्रोस्तव दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमवेळी सामाजिक, राजकीय ,सासकृतिक तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी यावेळी या कार्यक्रमास उत्सवाला भेट दिली. विविध उपस्थित मान्यवर याचा सत्कार करण्यात आला . यावेळी शिवसेना नेते अरुण दुधवडकर ,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगरसेवक मुंबई शेयलेश परब ,भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली , संदीप दळवी,संजय पडते , सिंधुदूर्ग जिल्हा बँक संचालक विदयाधर परब , तालुका अध्यक्ष शिवसेना रुपेश राऊळ , माजी जिल्हा परिषद सभापती बाळा गावडे , तळवडे सरपंच अनिता मेस्त्री , तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर , विवध गावातली सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
यावेळी या श्री देव दाळकर देवाच्या वार्षिक उत्सव दिवशी बंड्या परब व कुटूंबीय परब मित्रमंडळ यांनी विविध कार्यक्रम याचे आयोजन केले होते. यावेळी नाट्य कलाकार याचा सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक बंडया परब यांनी उपोस्थित मान्यवर याचे आभार मानले .