कोकणच्या विकासासाठी चांगले प्रकल्प आणा

मंत्री केसरकर यांचा हवाई दौरा हा नेमका कशासाठी पर्यटन प्रकल्प कोकणात आणणार का?
सावंतवाडी प्रतिनिधि
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आरोदा खाडीपात्राची केलेली पाहणी ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासाठी होती की जमीन खरेदी विक्रीबाबत होती.अशी टीका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ देवेंद्र परुळेक यांनी केली. आज आपल्या कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प आणून चांगले प्रकल्प गुजरातला नेले जातात. आज सत्ताधारी आपल्या लोकावर हे प्रदूषणकारी प्रकल्प लादत आहेत आहे .या ठिकाणी चांगले प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावे त्याचे आम्ही स्वागत करू असे त्यांनी सांगितले बार्सू येथे पेट्रोल केमिकल प्रकल्पाच्या निमित्ताने तेथील ग्रामस्थ व महिलावर होणाऱ्या दडशाहीच्या बाबत बाबत केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
बारसूया ठिकाणी होणारा पेट्रोल केमिकल प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. मात्र सरकार ग्रीन रिफायनरी म्हणून हा प्रकल्प पुढे करत आहे मात्र या ठिकाणी परदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे. माञ यातून निर्माण होणारे प्रदूषण हे कोकणात गोव्यालाही हानिकारक ठरणार आहे. आज रोजगाराच्या नावाखाली हा प्रकल्प येथे लादण्याचां प्रयत्न होत आहे .मुळात या ठिकाणी शिपाई ,सिक्युरिटी ,गार्ड यांच्यात नोकरी शिल्लक राहणार आहे, त्यामुळे रोजगारांचे खोटे गाजर दाखवू नका ,कोकण मध्ये प्रकल्प आणायला आमचां विरोध नाही वेदांत फॉस्ककॉर्न ,टाटा एअर बॉक्सहे प्रकल्प गेले कुठे ,याचे उत्तर सरकारने द्यावे. आज चांगले प्रकल्प गुजरातला दिले जात आहेत व प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात का आणले जातात, चांगले प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करु असे मत पत्रकार परिषदेत डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.