आयडियल इंग्लिश स्कूलच्या कु.यश तांबे याची स्केटिंग स्पर्धेत विभाग स्तरावर निवड

कणकवली/मयूर ठाकूर

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे चा विद्यार्थी कु.यश तांबे( इयत्ता नववी) याने जिल्हास्तरावर यश मिळवत विभाग स्तरावर झेप घेतली आहे सातत्यपूर्ण सराव आणि आपल्या बहारदार खेळाच्या जोरावर यशने हा जिल्हास्तराचा टप्पा पार करत विभाग स्तरासाठी आपली जागा निश्चित केली आहे
या त्याच्या यशासाठी स्केटिंग प्रशिक्षक श्री. योगेश सामंत सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!