डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कणकवलीत ‘स्मृतिजागर’ कार्यक्रमनिवडक साहित्य आणि त्यांच्याविषयीच्या लेखांचे अभिवाचन

११ ऑक्टोबर रोजी आयोजन
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आणि कोकण मराठी साहित्य परिषद, कणकवली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या दहाव्या स्मृतितिथीनिमित्त ‘स्मृतिजागर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या निवडक साहित्याचे तसेच त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखांचे अभिवाचन करण्यात येणार आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करणे, त्यांच्या साहित्यविचारांना उजाळा देणे आणि साहित्यप्रेमींना त्यांच्या लेखनाचा पुन्हा एकदा परिचय करून देणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.
हा कार्यक्रम वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात, एसटी वर्कशॉपजवळ, बिजलीनगर, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
साहित्यप्रेमी, वाचक आणि रसिकांनी या स्मृतिजागर कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि कोकण मराठी साहित्य परिषद, कणकवली शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.






