कणकवली नगरपंचायत व कनकसिंधु शहर स्तर संघ यांच्या वतीने पितृ पंधरवड्यानिमित्त ‘एक हात मदतीचा’ या आदर्शवत उपक्रमाचे आयोजन….

     ‘स्मृती त्यांच्या, सेवा आपल्या हातून आणि समाधान एखाद्याच्या चेहऱ्यावर!’ या भावनेतून कणकवली नगरपंचायत, कणकवली, महिला बालकल्याण विभाग DJAY-S व कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली यांच्या वतीने सेवा संकल्प अभियान व पितृ पंधरवडा यांचे औचित्य साधून ‘एक हात मदतीचा… आपल्या प्रियजनांच्या स्मृतींसोबत’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
            आपल्या प्रियजनांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून गरजू व्यक्तींना आवश्यक वस्तू व साहित्याच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचे आवाहन बचत गट व नागरिकांना करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत साबण, टूथपेस्ट व ब्रश, खाद्यतेल, तांदूळ, डाळी व इतर धान्य, कपडे तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तू स्वीकारण्यात आल्या.या उपक्रमात शहरातील 150 नागरिकांनी सहभाग होत मदतीचा हात दिला. 
      जमा करण्यात आलेले वस्तू व साहित्य कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, मुख्याधिकारी श्रीम.गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक याच्या उपस्थित जिल्हातील वृद्धासाठी काम करणारे जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदश्रय वृद्धाश्रम,पणदूर व दिविजा वृद्धाश्रम, असलदे, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय,करंजे ता.कणकवली या तीन संस्थाना जमा झालेल्या वस्तू व साहित्य देण्यात आले. ‘आपली छोटीशी मदत एखाद्यासाठी मोठा आधार ठरू शकते!’ या संदेशातून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची आणि आपल्या प्रियजनांच्या स्मृतींना माणुसकीच्या सेवेतून आदरांजली देण्याची प्रेरणा या उपक्रमातून देण्यात आली.
    यावेळी भेट देण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय,करंजे मुख्याधापिका श्रीम. रश्मी सोगम, अधिक्षक भिकाजी कदम, दिविजा आश्रम, असलदेचे साधना तेलतुंबडे यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे सामाजिक उपक्रमात सहभाग घेत सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीच सहकार्य केल्यास अनेक आश्रमांना प्रोत्साहन मिळेल असे म्हणाले व आपल्या संस्थेची निवड केल्याबद्दल आभार मानले.
    या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कणकवली नगरपंचाय मुख्याधिकारी श्रीम.गौरी पाटील यांचे मार्गदशन व सहकार्य लाभले. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, कनकसिधु शहर स्तर संघ,कणकवलीच्या अध्यक्ष प्रिया सरुडकर ,सचिव शुभांगी उबाळे,खजिदार दिव्या साळगावकर, कार्यकारणी सदस्य विशाखा कांबळे, स्वाती गोखले,सुचिता पालव, ज्योती रावराणे, निलम कोरगावकर,यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी भविष्यातही अश्या प्रकारे नागरिक यांना काही मदत द्यायची असेल तर त्यांनी कणकवली नगरपंचायत, किंवा कनकसिधु शहर स्तर संघ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करून सहभागी सर्व नागरिक यांचे आभार मानण्यात आले.
error: Content is protected !!