जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयडियल मध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

कणकवली/मयूर ठाकूर

जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने नुकतेच आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे येथे मोफत वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी जिजाऊ संस्थेचे सिंधुदुर्ग प्रवक्ते श्री. अमर राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर, आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या वह्यांचे वाटप इयत्ता k.g.te 12 वी पर्यंतच्या मुलांना करण्यात आले.
आपल्या मनोगतात राऊत जिजाऊ संस्थेचे उपक्रम व कार्य वाटचाल याचा आढावा घेतला.
या कार्यक्रमासाठी मान्यवर पाहुणे तसेच प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!