मालडी येथे ४ व ५ डिसेंबर रोजी भावई देवी मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन

मालवण तालुक्यातील मालडी गावचे ग्रामदैवत श्री भावई देवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही ४ व ५ डिसेंबर रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

४ डिसेंबर रोजी सकाळी देवीची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात येणार आहे. या सोहळ्यात २० पेक्षा अधिक भजन मंडळे सहभागी होणार असून, मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत पारंपरिक दिंडी काढण्यात येणार आहे.

५ डिसेंबर रोजी सकाळी काकड आरती, उत्तरपूजा व महाआरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद आयोजित केला आहे.

या भक्तिमय सोहळ्याचा लाभ परिसरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन मालडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!