कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा

घरकुल लाभार्थ्यांना संविधान प्रत प्रदान

   कलमठ सिद्धार्थ कॉलनी येथील संविधान स्तूपला पुष्पहार अर्पण केला तसेच संविधानाचे वाचन करून कलमठ ग्रामपंचायत मार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला. कलमठ ग्रामपंचायत वतीने बांधण्यात आलेल्या संविधान स्तूप येथे कलमठ येथील प्रधानमंत्री  आवास योजेनेतील लाभार्थी यांना संविधानाची प्रत देण्यात आली.  संविधानाने खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि प्रेरणा दिली असून आपल्या कार्य काळात ग्रामपंचायत वतीने संविधान स्तूप गावात उभारली असल्याचा कायम अभिमान आहे असे यावेळी सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले.

ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, सिद्धार्थ कॉलनीचे चेअरमन सूर्यकांत कदम, महादेव कदम, श्रद्धा कदम, माधवी कदम, रोहन कदम, घरकुल लाभार्थी सुनीता पाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्र कदम, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, अण्णा सावंत, शैलेश कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!