घोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदत

सांगली येथील प्रीतम आनंद वृद्धाश्रम संस्थेस संजय घोडावत फौंडेशन तर्फे पायाभूत सोयी सुविधांसाठी व दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ही मदत दरमहा असणार आहे. वृद्धाश्रमाचे उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्त विनायक भोसले , सौ विजयाताई पृथ्वीराज पाटील, अध्यक्ष अभिनय कामाजी उपस्थित होते.

 संपूर्ण समाजात कोणताही ज्येष्ठ नागरिक एकटेपणा मुळे निराश,हताश होऊ नये आणि कोणत्याही आजी-आजोबांना आपलेपणा ,आपुलकी, प्रेम जिव्हाळा व आत्मसन्मान देण्यासाठी सादर संस्था कार्य करेल असे अध्यक्ष अभिनय कामाजी यांनी सांगितले.

 वृद्धाश्रमामध्ये बैठे खेळ कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, चित्रकला, हस्तकला, विणकाम , तबला, गिटार, हार्मोनियम पेटी, पियन बासरी, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप ,पोहण्यासाठी तलाव तसेच धार्मिक वाचनयासाठी वेगळा  हॉल इ.  विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

 या वृद्धाश्रमासाठी  सर्व आवश्यक ती मदत संजय घोडावत फौंडेशन करेल असे अश्वासन संजय घोडावत यांनी दिले. 

  संजय घोडावत फौंडेशन तर्फे माउली केअर  सेन्टर कोल्हापूर , मिरज येथे अंध शाळा,  इ  संस्थांना दरमहा आर्थिक मदत केली जाते. विविध शाळांना साहित्य  इत्यादी स्वरूपात , लोटस केअर सेंटर, कोल्हापूर या संसंस्थेस एड्स ग्रस्त रुगणांना  औषधोपाचार करण्यासाठी  मदत केली जाते.

 प्रीतम आनंदशाळा या ठिकाणी इनडोअर स्टेडिअमची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्पोर्ट्स अकादमी सुरु करून देशभरातून मान्यवर क्रीडा  प्रशिक्षक  आणून त्यांचे मार्गदर्शनाखाली चांगले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यावर भर असेल असे संजय घोडावत यांनी सांगितले.

यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष कामाजी यांनी या उपक्रमास मदत केलेबद्दल संजय घोडावत फौंडेशन व पदाधिकारी यांचे आभार मानले.

error: Content is protected !!