कुडाळ रेल्वे स्थानकावर आरोग्य शिबिरांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

१९ सप्टेंबरला फिझिओथेरपी शिबीर तर २०-२१ ला सांस्कृतिक कार्यक्रम

गणेशोत्सवाचे औचित्य

गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसह नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १९ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोग्य शिबिरे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
उद्या, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी कॉलेज, कुडाळ यांच्या वतीने विनामूल्य फिजिओथेरपी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच २० सप्टेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सौजन्याने ईसीजी तपासणी तसेच हृदयविकारासंदर्भातील आजारांची माहिती व मार्गदर्शन देणारे विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवता यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
नागरिकांनी तसेच रेल्वे प्रवाशांनी या विनामूल्य आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!