घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे संचालक भाऊराव घाडीगावकर यांचे निधन


किर्लोस गावचे सुपुत्र आणि घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे संचालक भाऊराव विष्णू घाडीगावकर (75 वर्ष ) यांचे अल्प आजाराने मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे आहेत. भाऊराव हे अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. प्राचीन मोडी लिपीचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी “मोडी लिपी मंथन” हे पुस्तक लिहिले असून ते प्रकाशित केले आहे. अनेक मोडी लिपी अभ्यासकांमध्ये त्यांचे नाव अग्रेसर होते. भाऊराव लेखकच नाही तर उत्कृष्ट असे काव्य करण्यामध्ये सुद्धा तरबेज होते. त्यांच्या गावाकडील त्रिमूर्ती हायस्कूल वर ते एक मार्गदर्शक म्हणून काम करीत असत. मुंबईतील बेस्ट मध्ये अधिकारी पदावरून पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेने निवृत्त झाले. त्यांचा स्वभाव शांत व स्मितभाषी होता त्यामुळे ते सर्वांना प्रिय होते. पतपेढीच्या प्रत्येक कार्यात हिरारीने सहभाग घेत असत. पतसंस्थेसाठी ते मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने पतसंस्था एका महत्त्वाच्या मार्गदर्शकास मूकलेली आहे. आमच्या संस्थेचे संचालक, कर्मचारीवृंद आणि तमाम सभासद त्यांच्या दुःखात सहभाग आहोत अशा शब्दात घाडीगावकर सहकारी पतपेढी अध्यक्ष रघुवीर शांताराम वायंगणकर यानी श्रद्धांजली वाहिली आहे.

error: Content is protected !!